अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 76 लाख 43 हजार रुपये किंमतीची निकृष्ट सुपारी जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 76 लाख 43 हजार रुपये किंमतीची निकृष्ट सुपारी जप्त

 अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 76 लाख 43 हजार रुपये किंमतीची निकृष्ट सुपारी जप्त


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-अन्न व औषध प्रशासनाला   दिनांक 27 जून 2024  रोजी विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या     गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केट यार्ड चौकामध्ये अशोक लेलंड वाहन क्र. KA-14, C- 7515, KA-14, C-0850 व KA-14, C-4619 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रीत व किटकबाधीत सुपारीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले.  सदर ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी या अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित 73 हजार 495 किलो  किंमत  76 लाख 43 हजार 37 रुपयाचा  साठा कमी दर्जाच्या संशयावरुन जप्त करुन ताब्यात घेतला असून, सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरु आहे.

 सदरची कारवाई विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे, उमेश भुसे व श्रीमती रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी, यांच्या पथकाने केली.

                                                                 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages