पदाधिकाऱ्यांनी आता जोमाने कामाला लागावे : काका साठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

पदाधिकाऱ्यांनी आता जोमाने कामाला लागावे : काका साठे

 पदाधिकाऱ्यांनी आता जोमाने कामाला लागावे : काका साठे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मोहोळ तालुक्याच्या निवडी जाहीर


कुरुल (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याने नेहमीच खा.शरद पवार यांच्यावर प्रेम केले आहे. ज्या-च्या वेळी पक्ष संकटात होता, त्या-त्या वेळी जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला खूप भरभरून दाद दिली आहे. कालच्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता भाजपच्या हुकूमशाहीच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला होता. आता देखील आपल्याला राज्याच्या निवडणुकीत जोरदार काम करायचे असल्याने नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटांचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी केले. 

बळीरामकाका साठे (सोलापूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश माने, तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील, लीगल सेल प्रदेश सरचिटणीस ॲड. पवन गायकवाड, सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रशांत बाबर, जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव देशमुख, युवक तालुकाध्यक्ष ॲड. विठोबा पुजारीयांच्या हस्ते तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या.

▪️ नवनियुक्त पदाधिकारी

रणजित चवरे (विधानसभा अध्यक्ष)

राजू रसाळ (मोहोळ शहराध्यक्ष)

श्रीकांत गायकवाड  (विधानसभा कार्याध्यक्ष) 

विक्रांत दळवी ( मोहोळ तालुका कार्याध्यक्ष)

सुमित पवार ( मोहोळशहर कार्याध्यक्ष)

ॲड. विनोद धावणे ( तालुका उपाध्यक्ष)

अतुल घुले (तालुका उपाध्यक्ष )

प्रमोद अवताडे ( तालुका उपाध्यक्ष) 

सुनील प्रल्हाद ( चिटणीस)

विकास फंड ( संघटक)

पांडुरंग हराळे (संघटक) 

इंद्रजीत धावणे ( युवक उपाध्यक्ष)

ॲड. पांडुरंग माने ( प्रवक्ता व प्रसिद्ध प्रमुख)

सुमित तुकाराम पवार (कार्याध्यक्ष मोहोळ शहर) 

साजिद बक्ष मोहोळ (शहर उपाध्यक्ष) 

प्रशांत हनुमंत गायकवाड (शहर उपाध्यक्ष) 

विशाल संजय सोलंकर (उपाध्यक्ष)

मनोज गायकवाड (सामाजिक न्याय विभाग मोहोळ तालुकाध्यक्ष), 

फय्याज शेख (मोहोळ तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष)


 मजबुतीला आणखीन मजबूत करूया : ॲड. पवन गायकवाड

- नवीन पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत हे शरद पवार या नावाचे सच्चे शिलेदार आहेत. राष्ट्रवादीवर प्रेम करणारे हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच राष्ट्रवादी हा मजबूत पक्ष पडत्यात काळात देखील टिकून होता. आज पुन्हा तो मजबूत झाला आहे. मजबूत असलेल्या पक्षाला पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळून मजबूत करूया.

- ॲड. पवन गायकवाड


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages