सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक मिथिलेश मिश्रा यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 19, 2024

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक मिथिलेश मिश्रा यांची नियुक्ती

 सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी 

जनरल निरिक्षक मिथिलेश मिश्रा यांची नियुक्ती

 

       सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 42- सोलापूर लोकसभा (अ.जा.) मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मिथिलेश मिश्र (भा.प्र.से.) यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

                    जनरल निवडणूक निरिक्षक मिथिलेश मिश्र (भा.प्र.से.) यांचे कार्यालय रेवती, शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून निवडणूकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे किंवा कोणतीही माहिती दयावयाची असल्यास सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत रेवती, शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा. तसेच  त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9518554043 हा असून त्यांचेशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages