Hot Posts

6/recent/ticker-posts

धनगर समाजातील वधू-वरांचा निःशुल्क मेळावा

 धनगर समाजातील वधू-वरांचा निःशुल्क मेळावा


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-राजमाता सामाजिक प्रतिष्ठान तर्फे धनगर समाजाचा निशुल्क वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजीत करण्यात येणार आहे. सुशिल रसिक सभागृह, सोलापूर येथे कार्याध्यक्ष बाळकृष्ण बंडगर व उपाध्यक्ष सुधीर कड्डी (पंढरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. २६ मे २०२४ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत मेळाव्याचे आयोजन केले आहे. संस्थेने वधु-वरांच्या माहिती पुस्तिकेचे मोफत नांव नोंदणी करीता मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत कालमर्यादा ठेवली आहे. यानंतर येणाऱया नोंदणीची दखल पुस्तिकेमध्ये किवा पुरवणी यादीमध्ये घेतली जाणार नाही. रविवार दि. २६ मे २०२४ रोजी सकाळी १० वा. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सक्षणा सलगर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्र राज्य युवती प्रदेशाध्यक्षा व चंद्रकांत बिज्जरगी (गुरुजी) धर्मशास्त्र अभ्यासक, विजयपूर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलाने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात होईल. यानंतर संस्थेने तयार केलेल्या सुबक व बहुरंगी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी पालकांनी व इच्छुकांनी संस्थापक रविद्र पां. नागणकेरी (९४२१०४१२१३), कार्याध्यक्ष बाळकृष्ण बंडगर (९६७३१८८१८८), उपाध्यक्ष सुधीर कड्डी (७०२०३९७१६९) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments