Ads

Ads Area

बळीराजा पार्टीचा जाहीरनामा

 बळीराजा पार्टीचा जाहीरनामा 

 ०९ सूत्री कार्यक्रम 

 शिक्षण ,प्रशिक्षण ,रोजगार ,आरोग्य ,कृषी 


I) शिक्षण : अ) मुलींसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र व तालुका स्तरावर स्वतंत्र रहिवाशी शाळा ब) महिला व मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी व्यावसायीक संगणक शिक्षण, डिजिटल मार्केटींग व व्यावसायीक प्रशिक्षण क) प्रत्येक गाव स्तरावर कामगार, होतकरु व आर्थीक दुर्बलांसाठी आंतराष्ट्रीय दर्जाच्याविद्यापिठांच्या माध्यमातुन दुरस्त (online) पदवी पर्यंत शिक्षण .

II ) रोजगार : संगणक प्रशिक्षण, कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग, प्री-प्रायमरी समुह शाळा, दुध प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन केंद्र, आध्यात्मीक पर्यटन विकास, कृषी उत्पन्न पॅकेजिंग व मार्केटींग.

III) आरोग्य : प्रत्येक गाव पातळीवर अयोग्य शिवीर आयोजन करून अयोग्य विषयक जागरूकता निर्माण करून गाव पातळीवर धर्मार्थ दवाखाना सुरु करणार.

IV) कृषी विषयक : अ) कृषी विद्यालय व कृषी आधारीत प्रक्रिया उद्योग व मार्केटींग ब) जल, जंगल, व जमिन
च्या माध्यमातुन मुलनिवाशी, आदिवासी बांधवांना रोजगारक्षम बनविण्यासाठी वनऔषधीपासुन आयुर्वेदिक औषधे
स्वस्त दरात उपलब्ध करता यावी या करिता वनौषधी संकलन व आयुर्वेदिक अनुसंधान केंद्र स्थापन करणार.

V) गाव तेथे गौशाला तशेच पशु रुग्नालयाची स्थापना व पशु अनुसंधान केंद्राची स्थापना करणार.

VI) शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार, दलित, पिडित, महिला यांच्या हिताचे व विकासाचे कायदे लोकसभेत मंजुर करण्यास पाठपुरावा करणार.

VII) 50 टक्के औद्योगिक CSR फंड शेतकर्यांसाठी आरक्षित करुन शेतकर्यांना त्या पैश्यांतुन निशुल्क बिज, खत व शेतीउपयोगी यंत्रे वाटप करण्यासंदर्भात संसदेत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार

VIII) आदिवाशी बाधवांच्या शासकिय योजनांची 100 टक्के अंमलबजावणी करणेसाठी पाठपुरावा करणार

IX ) बळीराजा कृषी विद्यालय व अनुसंधान केंद्र. राजमाता जिजाऊ मुलींची रहिवाशी शाळा व महाविद्यालय
स्थापना.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close