बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस. आर. अंर्तगत दहा प्राथमिक शाळेतील १२०० विदयार्थ्यांना गंमत ग्यान अॅक्टीव्हिीटी बुक पुस्तकांची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 17, 2024

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस. आर. अंर्तगत दहा प्राथमिक शाळेतील १२०० विदयार्थ्यांना गंमत ग्यान अॅक्टीव्हिीटी बुक पुस्तकांची भेट

 बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस. आर. अंर्तगत दहा प्राथमिक शाळेतील

 १२०० विदयार्थ्यांना गंमत ग्यान अॅक्टीव्हिीटी बुक पुस्तकांची भेट

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  जिल्हयातील सहा शाळा व धाराशिव जिल्हयातील ४ शाळांतील १२०० विदर्थाना गंमत ग्यान अॅक्टिव्हिटी बुक वाटप दि १७.०२.२३ शनीवार रोजी बालाजी अमाईन्सच्या होटगीरोड येथिल कार्यालयात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डी राम रेडडी सर यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्स व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी सर यांनी गंमत ग्यान पुस्तकांमुळे मुलांचा वेळ मोबाईल पर कमी होईल मुले हया पुस्तकामधिल खेळांमध्ये रमतील या करणाने त्यांच्या ज्ञानात भर पडेल तसेच कुठल्याही विषयावर निरिक्षण व त्या वस्तूकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हावा या करीता प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या १२०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. यास मिळणारा प्रतिसाद व शिक्षकांचा फिडबॅक पाहून पुढिल काळात जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचा विचार आहे असे सांगितले . प्रारंभी बालक पालक गंमत ग्यान पुस्तकाबददल श्री विनायक जोशी सर यांनी माहीती व शिक्षकांना पुस्तकातील २४ अॅक्टिीव्हीटी बददल माहीती दिली. सर फाऊंडेशन चे सिध्दाराम माशाळेसर यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञान वाढीसाठी व मुलांना हसतखेळत कोडी सोडवत अभ्यास आहे हे पुस्तक उपलब्ध करून दिल्या बददल बालाजी अमाईन्सच्या सर्व संचालक मंडळ व बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेडडी सरांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी जि प प्राथमिक शाळा मजरेवाडी येथिल राचेटीसर यांनी व जि प प्राथमिक शाळा तामलवाडी येथिल ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम यांनी ग्रामिण भागातील शाळा सहभागी केल्यामुळे याचा मुलांना फायदा होईल असे विचार व्यक्त केले.

या कार्यकमास बालाजी अमाईन्सचे सी. एस. आर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदारसर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक बाळासाहेब वाघसर, प्रकाश राचेटी सर, सिध्दाराम मशाळेसर, गुणवंत चव्हाणसर (पिंपळा खुर्द) , ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम (तामलवाडी), वाघमारेसर (पिंपळा बु,) प्रक्षाळेमॅडम, मोरेश्वर मॅडम (शिंगडगाव), प्रतिमा जाधव मॅडम (निंबगी), विविध शाळां मधिल सर विदयार्थी व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते .

सोलापूर जिल्हयातील ६ शाळा

१. जि. प. प्राथमिक शाळा मजरेवाडी

२. जि. प. प्राथमिक शाळा सोरेगाव

३. जि. प. प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे

४. जि. प. प्राथमिक शाळा कवठेतांडा

५. जि. प. प्राथमिक शाळा शिंगडगाव

६. रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा निंबर्गी

धाराशिव जिल्हयातील ४ शाळा

१. जि. प. प्राथमिक शाळा तामलवाडी

२. जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा खुर्द

३. जि. प. प्राथमिक शाळा गोंधळवाडी

४. जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा बुढुक

गंमत ग्यान फॅमिली अॅक्टिव्हीटी बुक : मुलांना विविध खेळांव्दारे २४ अॅक्टिव्हीटी मधुन विविध विषयावर ज्ञान सहज व सोप्या पध्दतीने प्राथमिक शाळेतील मुलांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मुळे मुलांची एकाग्रता निरिक्षण क्षमता सकारात्मकता संयम तसेच विविध विषया मधिल सध्याचे ज्ञान या सर्व वाढीकरीता उपयोगी असे पुस्तक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages