Hot Posts

6/recent/ticker-posts

छ्त्रपतींच्या जयघोष अन शिवगीतांनी जिल्हा परिषद दणाणली l

 छ्त्रपतींच्या जयघोष अन शिवगीतांनी जिल्हा परिषद दणाणली l

     सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उदयानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचेहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले तर मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद शाखेच्यावतीने यशवंतराव सभागृहात  शाहिराचा मर्दानी पोवाडा, अंगावर शहारे आणणाऱ्या  शिवगीतानी सभागृह दणाणून गेले.

    जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने रंगभवन चौकातील शिव उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास    मुख्य कार्यकारी अधिकारी  मनिषा आव्हाळे  यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ येथील रूपेश क्षीरसागर,  किरणकुमारी गायकवाड, एकनाथ कुंभार, महेश म्हेत्री , परवेझ शेख, राजाराम बाबर यांना शिव गीतांचा बहारदार कार्यक्रम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,  अमोल जाधव, महिला बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले,  शिक्षणाधिकारी सुलभा वठारे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, कार्यकारी अभियंता  संतोष कुलकर्णी, सुनिल कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,मराठा सेवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ जी.के.देशमुख, दत्ता मामा मुळे, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष सदाशिव पवार, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, वाय पी कांबळे, दिनेश बनसोडे  विवेक लिंगराज, गिरीष जाधव, समीर शेख, योगेश हब्बु, चंद्रकांत होळकर  उपस्थित होते. यावेळी स्वानंद टीचर च्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळे गीते सादर करून स्फुल्लिंग चेतले. सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आल्यामुळे वातावरण निर्मिती झाली. जय शिवाजी जय भवानी अशा घोषणाने वातावरण दुमदुमून गेले. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिवरायांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असे आवाहन केले.


    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन वाघमारे, आदम मन्सुर नाईक,सचिन चव्हाण, अनिल जगताप, म.ज. मोरे, सचिन साळुंखे, राम जगदाळे, अजीत देशमुख सचिन चवरे, सुधाकर माने देशमुख, नितीन  चेतन भोसले, विशाल घोगरे, रोहीत घुले, अनिल पाटील, संजय चव्हाण, सचिन पवार, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, भूषण काळे, विठ्ठल मलपे, संतोष शिंदे, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, रणजीत गव्हाणे,गणेश साळुंखे, महेंद्र माने, उमेश खंडागळे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, आनंद साठे, जयवंत जाधव, संतोष नीळ, अशोक मोरे, प्रकाश शेंडगे, अभिजीत निचळ , देशमुख, राजाराम रणवरे, गिरीष धुमाळ, सुनिता भुसारे, अश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, ज्योन्सा साठे, भारती धुमाळ, सविता मिसाळ अर्चना निराळी, अनिता तुपारे, छाया क्षिरसागर,

Reactions

Post a Comment

0 Comments