मर्दानी लाठीकाठी स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग.
स्वराज सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोलापूर शहर जिल्हा लाटी
असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन...
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ३९४ व्या शिवजयंती निमित्त स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार ,प्रदेशाध्यक्ष खा,सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोलापूर शहर -जिल्हा लाठी असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने लाठी स्पर्धेत काठ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.
हे लाठीकाठी स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या व महाविद्यालयाच्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धा पोलिस कल्याण केंद्र येथे पार पडल्या . सोलापूर शहर -जिल्हा लाठी असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी एकम लाठी ,द्वेय लाठी ,पंच आणीखा ,काट पविञा ,द्वेय आणीखा ,अशा उत्कृष्ट विविध पारंपारिक मर्दानी खेळांचे सादरीकरण केले.या प्रात्यक्षिकांबद्दल उपस्थित विविध मान्यवरांनी विशेष कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव , प्रदेश युवक सरचिटणीस खलिल शेख , सोलापूर शहर -जिल्हा लाठीकाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले ,जिल्हा सचिव तथा आंतरराष्ट्रीय पंच अश्विन कङलासकर ,जिल्हा सहसचिव व महिला प्रशिक्षिका तथा राष्ट्रीय पंच अंजना कङलासकर प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच राहुल भोसले ,प्रशिक्षक अमर भोसले ,सदस्य भाऊसाहेब भोसले ,रणजित भिसे ,सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती...

0 Comments