वृषाली डबडे यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सनमानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 7, 2024

वृषाली डबडे यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सनमानित

 वृषाली डबडे यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सनमानित

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- पालवी फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा आनंदी पेशंट केअर च्या संचालिका वृषाली दबडे यांना सामाजिक कार्यासाठी यशवंतराव चव्हाण फाउंडेशन यांचा यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला वृषाली डबडे या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा सामाजिक पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला होता. ऑफिसर्स क्लब नवी मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात माहिती अधिकारी ठाणे जिल्हा मनोज सानप, नवी मुंबई मल्टीस्टेट च्या संचालिका जया अलमचंदानी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वृषाली डबडे यांनी आजवर अनेक गरजू पेशंटला सेवा पुरवणे कोरोनाच्या काळामध्ये गरोदर महिलांच्या रक्त , लघवी तपासणी यांच्या टेस्ट वेळेत करुन देणे, समाजातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे अशा अनेक समाज उपयोगी कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना  पुरस्काराने गौरविले आहे. पुरस्काराठी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 या पुरस्कार वितरण समारंभासाठी समाजसेविका श्रीमती मेघना काकडे, भरत पाटील यांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages