Ads

Ads Area

बावी गावातुन ६२ शेतकर्‍यांनी रक्ताने लिहिले उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना पत्र सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्याची पत्राद्वारे मागणी

 बावी गावातुन ६२ शेतकर्‍यांनी रक्ताने लिहिले उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना पत्र

सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्याची पत्राद्वारे मागणी

 मोडनिंब(कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील दुष्काळी बावी  गावाचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी ६२ शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहुन मागणी केली आहे. बावी येथे ५ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांनी रक्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहले आहे. बावी येथील शेतकरी गेली अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरु असतानाच सोमवारी शेतकरी आक्रमक झाले.

बावी गावचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन समावेशन प्रस्ताव दि.७ डिसेंबर २०२२ रोजी जलसंपदा विभागाचे अव्वर सचिव संदीप भालेराव यांच्याकडे दाखल आहे. त्याबाबतीत वेळोवेळी पाणी संघर्ष समिती तसेच आ. बबनराव शिंदे, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ही सतत मागणी केली आहे. सीना-माढा योजनेचे पाणी बंद नलिकाद्वारे वितरण केल्याने उरलेले पाणी बावी (ता.माढा)  गावाला देण्याची शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाने एक जीआर काढून समिती नेमली होती. त्या समितीने त्यांचा अहवाल दाखल करून नागपूर येथे (फाईल क्र. सिंचन- २०२३/प्र.क्र.११/ज.सं. (धोरण) नलिका वितरण प्रणालीमुळे बचत होणाऱ्या पाण्याचे सुयोग्य धोरण ठरविणे) दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी जलसंपदाच्या कार्यालयामध्ये सबमिट झाली आहे. त्यावर तात्काळ निर्णय घेऊन बावी व इतर गावचा समावेशन प्रस्ताव दि.७ डिसेंबर २०२२ शासनाचे अव्वर सचिव संदीप भालेराव यांच्याकडील प्रस्तावावर मंजुरी द्यावी व बावी गावचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करावा, अशी विनंती या शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी पाणी संघर्ष समिती बावीचे अध्यक्ष सुरज मोरे, उपाध्यक्ष परशुराम मोरे, सचिव परेश मोरे, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, उपसरपंच मुन्ना मोरे, रोहीत मोरे, मंगेश मोरे, उदयसिंह मोरे, अक्षय मोरे, शिवाजी मोरे, निलेश मोरे,अक्षय मोरे, शिवाजी मोरे, दत्ता रणदिवे, संतोष साहेबराव मोरे, रविराज चव्हाण, अमोल परबत, एम. बी. मोरे, शुभम चव्हाण,शंकर पवार, प्रशांत ज्ञानदेव मोरे, सिध्देश्वर शरद मोरे, मंगेश कुलकर्णी, सागर रा. मोरे, योगेश मोरे,अमोल मोरे, रहिमान मुलाणी, शहाजी मोरे, ऋषिकेश मोरे, अमिर मुलाणी, तुषार सुहास मोरे, विशाल रोकडे, धीरज अभिमान मोरे, सौदागर मोरे, सूरज प्रविण मोरे, सुनिल अप्पा मोरे, आकाश नागनाथ मोरे, सचिन नवनाथ मोरे, सिध्देश्वर अरुण मोरे,महेश पोपट मोरे, अमोल शहाजी मोरे, सागर नामदेव मोरे,अविनाश मोरे,आकाश मोरे, सुधीर पवार, अमोल नवनाथ मोरे,संतोष रावसाहेब मोरे, अनिल पोपट मोरे, सिध्देश्वर तुकाराम मोरे, अमित मोरे,संजय सतीश मोरे, पृथ्वीराज शंकर मोरे, अमर सुशीलकुमार मोरे,संकेत बंडू मोरे,महेश शिवाजी मोरे,आकाश दिलीप मोरे, रामचंद्र विठ्ठल मोरे, बळीराम नारायण माळी,शहाजी महादेव चव्हाण,भाऊसाहेब नवनाथ मोरे,रविराज शंकर मोरे,बाळासाहेब माळी, निखिल गाडे आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close