Ads

Ads Area

सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाला मान्यता

 सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाला मान्यता 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  नागरिक भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्याकरिता शासन निर्णयाच्या तरतुदी अन्वये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान  राबवण्यात आलेले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता.

              सोलापूर महानगरपालिकेकडून सोलापूर शहरातील व हद्दवाढ भागातील विद्यमान खुले नाले यांचा सर्वकश सर्वेक्षण करून एकूण 30 नाल्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्यापैकी फेज एक अंतर्गत गेल्या तीन चार वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे सकल भागात पावसाचे पाणी थांबून अनरोग्य परिस्थिती निर्माण झालेली होती अशा ठिकाणचा भाग प्राधान्याने विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये 19 ठिकाणच्या खुल्या नाल्यांचा समावेश असून यांच्या बांधकामासाठी रक्कम रुपये 98.91 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. मसुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पास महाराष्ट्र शासन नगर विकास विभागा यांनी दिनांक 20-2-2024 रोजी रक्कम रुपये 98.91 कोटी यास प्रशासकीय मान्यता दिलेली असून त्यामध्ये सदर प्रकल्पाचे वित्तीय आकृतीबंध मध्ये राज्य शासन अनुदान 70 टक्के (रक्कम रुपये 69.24 कोटी ) व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग 30 टक्के (र. रु 29.37 कोटी ) असा आहे. मा आयुक्त तथा प्रशासक यांनी सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाला मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तुत प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close