Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरात व हद्दवाढ भागामध्ये 1 लाख घरांना भुयारी गटारी घरजोड कनेक्शन मिळणार

सोलापूर शहरात व हद्दवाढ भागामध्ये 1 लाख घरांना  भुयारी गटारी घरजोड

 कनेक्शन मिळणार 


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागरिक भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्याकरिता शासन निर्णयाच्या तरतुदी अन्वये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान  राबवण्यात आलेले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या मल निसारण प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता.

         सोलापूर शहरात व हद्दवाढ भागामध्ये राज्य शासनाच्या अमृत 1.0 या योजनेअंतर्गत 180.24 कोटी इतक्या रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेनुसार 227 किलोमीटरच्या ट्रक लाईन व डिस्ट्रीब्यूशन लाईन यास मंजुरी प्राप्त झाली होती. त्यानुसार आजला  225.78 किलोमीटर इतके काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर देसाई नगर येथील एच.टी.पी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येत आहे.

      महाराष्ट्र सुवर्ण जयंती  महाभियान ( राज्यस्तर ) अंतर्गत  भुयारी गटारी योजनेस मा. राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.सदर योजनेत  शेळगी , दहिटणे,हिपरगा, बाळे, केगांव, देगांव, डोणगाव रोड, सोरेगाव, विजापूर रोड जुळे सोलापूर, होटगी रोड, जुना कुंभारी रोड परिसर या भागाचा समावेश आहे. अमृत 1.0 च्या योजनेमधील झालेल्या कामाव्यतिरिक्त शहर व हद्दवाढ भागात उर्वरित ठिकाणी नव्याने करावयाच्या ट्रक लाईन व डिस्ट्रीब्यूशन लाईन नेटवर्कची लांबी 207.54 किलोमीटर इतकी असून त्यास आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी तसेच देगाव येथे 49 एम.एल. डी चा एस.टी.पी विकसित करणे याकामी र. रु 363.88 कोटी + जीएसटी इतका खर्च अपेक्षित आहे.सदर योजने मुळे जवळ पास संपुर्ण शहरास   ड्रेनेज लाईन ची सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेचा  साधारण पणे 1 लाख घरांना घरजोड कनेक्शन मिळू शकेल.

    महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर शहराच्या व हद्दवाढ भागात मलनिसारण   प्रकल्प विकसित करणे कामी महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी 20 -2 -2024 रोजी रक्कम रुपये 429.38 कोटी यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामध्ये सदर प्रकल्पाचे वित्तीय आकृतीबंध मध्ये राज्य शासन अनुदान 70 टक्के (र.रु.300.57 कोटी )व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग 30 टक्के (र. रु.128.81 कोटी) असा आहे.

     आयुक्त तथा प्रशासक यांनी सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाला मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तुत प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments