सोलापूर महानगरपालिकेकडील मिळकत कर विभागाकडे अदयापर्यंत
नोंदणी न केलेल्या मिळकतदारानी मार्च, 2024 अखेर पर्यंत मिळकत कर
विभागाकडे नोंद करुन घ्यावी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका शहर व हद्दवाढ मधील बरेच मिळकतदार तसंच विकसक यांनी खुल्या जागा अथवा जुने बांधकाम काढून सदनिका (अपार्टमेंट) व रो हाऊसचे बांधकाम केलेले आहे. तसेच वापर परवाना घेऊन विक्री करुन वापरास सुरवात केलेली आहे. तथापी महानगरपालिकेकडील मिळकत कर विभागाकडे अदयापर्यंत नोंदणी केलेली नाही. अशा सर्व मिळकतदार व विकसनकार यांना कळविणेत येते कि, माहे मार्च, 2024 अखेर पर्यंत आपल्या सदनिकांची नोंद करुन घ्यावी. माहे मार्च, 2024 अखेर पर्यंत मिळकत कर विभागाकडे नोंद करुन मिळकत कराची आकारणी करुन घेतल्यास ज्या वर्षापासून आकारणी करण्यात आलेली आहे ती सर्व कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करावर 5% सूट देण्यात येणार आहे. तसेच जे मिळकतदार मिळकत कर विभागाकडे नोंद करुन आकारणी करुन घेणार नाहीत त्यांना पुढील आर्थिक वर्षापासून अधिनियमातील तरतूदीनुसार दरमहा 2% दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. याची सर्व मिळकतदार व विकसनकार यांनी नोंद घ्यावी.

0 Comments