Hot Posts

6/recent/ticker-posts

आईच्या खुनाचा प्रयत्न आरोपीस जामीन मंजूर

 आईच्या खुनाचा प्रयत्न आरोपीस जामीन मंजूर


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-आईच्या खुनाचा केल्याप्रकरणी अटक केलेला प्रयत्न आरोपी प्रदीप ऊर्फ बबलू शिंदे यांस जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीने स्वतःच्या आईला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेतातील विहिरीजवळ बोलावून शिवीगाळ करून व हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुला आज जिवंत ठेवत नाही.असे म्हणून ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले. त्यावेळी तिने सकाळी ७:३० ते सायंकाळी ४ पर्यंत शेतातील विहिरीत मदतीसाठी वाट पाहिली होती. आरोपी हा घरातील शेतीच्या कारणावरून व शेतातील उत्पन्नाच्या पैशासाठी नेहमी आईसोबत व परिवारासोबत भांडण करीत असत. फिर्यादीस उपचाराकरिता सोलापूर जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपीविरुध्द मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अँड. कदीर औगे. अॅड. इमरान पाटील, अँड मनोज गावडे. अॅड. दत्तात्रय कापरे अँड सोहेल रामपूर यानी काम पाहिले.

Reactions

Post a Comment

0 Comments