Ads

Ads Area

नमो नवंमतदार संमेलन सोलापूर विद्यापीठात उत्साहात संपन्न

 नमो नवंमतदार संमेलन सोलापूर विद्यापीठात उत्साहात संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्या मार्गदर्शनाखाली 5 हजार  तर महाराष्ट्रात भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 ठिकाणी नवं मतदाता संमेलन आयोजित करण्यात आले असून,पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुलातील हॉल मध्ये या संमेलनाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतीराज होनमाने व भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले होते

आज या नमो नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील 5 लाख तर महाराष्ट्र राज्यातील 50 हजार नवं मतदारांशी सवांद साधला असून,सोलापूर विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला. मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात झालेला कामांची माहिती, त्याचबरोबर पुढील टर्म मध्ये जगात टॉप तीनमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जाणार असल्याने युवा वर्गांनी मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे राहावे, व लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात युवकांनी आपल्या सूचना नमो अँप च्या माध्यमातून कराव्यात असे आवाहन आदरणीय पंतप्रधान महोदय यांनी यावेळी केले. 

कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखाने व यतीराज होनमाने यांनी उपस्थित नवं मतदारांना नमो अँप डाउनलोड करण्याचे आवाहन केले व याच्या माध्यमातून थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी जोडण्याची आपल्याला संधी असल्याचे सांगितले 

युवा वर्गाचाही यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज होनमाने आणि अक्षय अंजीखाने यांच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार,SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने,भाजयुमो शहर चिटणीस ओंकार होमकर,विनोद गडगे यांची होती

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. विनायक धुळप आदींनी यासाठी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close