चला तीन दिवस सुट्टीला फिरायला जाऊया....
आपण सुट्टी मिळाली की बाहेर फिरायला जातो. ट्रिप आयोजित करतो. धार्मिक स्थळी, गडकोट किल्ल्यावर, समु्द्रस्थळी, परराज्यात, परदेशात अथवा मेट्रो पॉलिटन सिटीत सहलीला जातो. धार्मिक यात्रा असली तर वर्षातून तीन ते चार दिवस गावाकडे जातोच. महाराष्ट्रातील मराठा मंडळी सौंदत्ती, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गणपतीपुळे, कोकण दौऱ्याला पसंती देतात. आषाढी यात्रेला पंढरीची वारी करतात. शिर्डी, अक्कलकोटला पायी पालखी सोहळ्यातून जातात.
यंदा प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी शुक्रवारी, चौथा शनिवार, आणि रविवार अशी जोडून सुट्टी आली आहे. सहलीला जाणाऱ्या मराठा समाजातील मंडळींनी यंदा तीन दिवसाची मिळालेली संधी लक्षात घेऊन मुंबईला ट्रीप काढली पाहिजे. मराठा आरक्षण प्रश्नांवर करा आणि मरा असा संघर्ष करण्यासाठी मराठावाडा बीड जिल्ह्यातून अंतरवाली सराटीवरुन मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच केले आहे. आज बुधवारी ते पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात आहेत. लाखो लोक त्यांच्यासमवेत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील लोकांनी तीन दिवस मुंबईला सहलीसाठी गेले पाहिजे. त्यांना पाठींबा देण्यासाठी मुंबईला गेले पाहिजे. अनेक मराठा समाजातील लोकांकडे चारचाकी वाहने आहेत. आपल्या गरीब मराठा बांधवासाठी त्यांनी मुंबईत गेले पाहिजे. मनोज जरांगेच्या आंदोलनस्थळी दोन ते तीस थांबून परत गावाकडे येण्याची गरज आहे. जो गरीब मराठा समाज आहे तो शेतात राबत आहेत. त्याची दुधाची जनावरे आहेत. त्यामुळे त्याला गाव सोडता येत नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोड आणि लावणीची कामे आहेत. अशा कामातून वेळ काढत प्रत्येक मराठा कुटुंबाने मुंबईला जायला पाहिजे. त्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांचा वापर करायला पाहिजे. आज कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वाहनाची सोय करणार नाही. ज्यावेळी त्यांच्या पक्षाचा मेळावा असतो तेव्हाच ते वाहन, खान्या पिन्याची सोय करतात. पण आता मराठा समाजाला एक दिवसासाठी पदरमोड करुन मुंबईला गेले पाहिजे. मुंबईला अनेकांचे पाहुणे आहेत. या पाहुण्यांना भेटून मनोज जरांगेच्या आंदोलनस्थळाला भेट देण्यासाठी गेले पाहिजे. जेवढी जास्त डोकी तेवढा सरकारवर दबाव आसणार आहे. मुंबईत राहणाऱ्या पै पाहुण्यांनी मनोज जरांगेंना पाठींबा देण्यासाठी येणाऱ्यांच्या निवासाची एक दोन दिवस पुढाकार घेतला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण २०२४ सालीच मिळू शकते. त्यासाठी मनोज जरांगेंनी जीव पणाला लावला आहे. राजकीय वस्त्रे उतरुन मनोज जरांगेना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जाण्याची वेळ आहे. २६ जानेवारीला मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. मराठा समाजातील व्यक्तींना ज्यावेळी वेळ मिळेल तेव्हा जरांगेच्या सभास्थळी भेट देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.

0 Comments