दैनिक पुण्यनगरी चा दिवाळी अंक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदिच्छा भेट...!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाची ताकद वाढत असली तरी सुद्धा वृत्तपत्रानी एक वेगळी ताकद आजही टिकवुन ठेवली आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये या वृत्तपत्रांनी जागल्याची भूमिका पार पाडल्यामुळेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरला. सध्याच्या धकाधकीच्या युगातही सर्वसामान्य नागरिकांचा सर्वात जास्त विश्वास हा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर असल्यामुळेच खऱ्या अर्थाने पत्रकारांनी सुद्धा समाजातील अन्यायविरुद्ध आपल्या लेखणीला धार दिली पाहिजे. आणि दाबलेल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्राचा दिवाळी अंक सदिच्छा भेट दिल्यानंतर पत्रकारांशी देवेंद्र फडणवीस यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना दैनिक पुण्यनगरी चा दिवाळी अंक सदिच्छा भेट देण्यात आला. दैनिक पुण्यनगरीचा दिवाळी अंक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यंकटेश पटवारी यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, आणि दैनिक कटूसत्यचे संपादक पांडुरंग सुरवसे आदी उपस्थित होते.

0 Comments