Hot Posts

6/recent/ticker-posts

दैनिक कटू सत्य चा दिवाळी अंक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती...!

 दैनिक कटू सत्य चा दिवाळी अंक

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती...! 

दिवाळी अंकाचे उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक....!! 


सोलापूर (कटू सत्य वृत्त): -सध्याच्या स्पर्धेच्या आणि गतिमान युगामध्ये चोखंदळ वाचक संख्या कमी होत असली तरी  गेल्या वीस वर्षापासून आपला वाचक वर्ग वाढवण्याबरोबरच सातत्याने सत्याला वाचा फोडणारी लेखणी दैनिक कटू सत्य च्या माध्यमातून समाज मनामध्ये घर करून उभा राहिले असून गेल्या वीस वर्षापासून दैनिक कटू सत्य चा दिवाळी अंक कोरोना महामारीत सुद्धा प्रसिद्ध झाला हे विशेष.. 

कुंभारी येथील रे-नगर च्या 15000 घरांचे लोकार्पण समारंभासाठी सोलापूर सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी दैनिक सोलापूर कटू सत्य दिवाळी अंक संपादक पांडुरंग सुरवसे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. 

याच वेळी दैनिक पुण्यनगरी चा दिवाळी अंक सुद्धा यावेळी पटवारी यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. 

यावेळी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments