Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनी कोंडी येथे रिपब्लिकन पार्टी करणार रस्ता रोको आंदोलन...! तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांची माहिती....!! कोंडी येथील दलित स्मशान भूमीचा प्रश्न दहा वर्षापासून प्रलंबित....!!!

 प्रजासत्ताक दिनी कोंडी येथे रिपब्लिकन पार्टी करणार रस्ता रोको  आंदोलन...! 

तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांची माहिती....!! 

कोंडी येथील दलित स्मशान भूमीचा प्रश्न दहा वर्षापासून प्रलंबित....!!! 

सोलापूर( कटू सत्य वृत्त): -संपूर्ण आयुष्यभर जीवन जगत असताना अनेक अडचणीला तोंड देत जगणाऱ्या दलित बांधवांना मृत्यूनंतरही स्मशानभूमी मिळत नाही. त्यामुळेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने तमाम आर.पी.आय. आणि आंबेडकर प्रेमी  अनुयायी सोबत घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या  मुहूर्तावर म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग कोंडी येथे भव्य आणि दिव्य रास्ता रोको सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आर.पी.आय.चे  उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की, "

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.  अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी कोंडी गावातील दलित बांधवांना मृत्यूनंतरही  अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथील दलित वस्तीसाठी जागा आणि सुसज्जा अशी स्मशानभूमी शासनाकडून मिळावी.  यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया   लढा  देत आहेत. परंतु निर्ढावलेल्या आणि  झोपी गेलेल्या शासनाला आमच्या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे आमच्या समाज बांधवातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  डोळं असून आंधळं आणि कान असून बहिरं झालेल्या  सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळेच  समाजाला गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमी अभावी राहावे लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले असली तरी मृत्यूनंतर सुद्धा ज्या समाजाला गुलामगिरी आणि मुस्कटदाबी यालाच तोंड द्यावे लागत आहे. अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील शासन दलित बांधवांच्या भावना आणि वास्तव परिस्थिती लक्षात घेत नाही. स्मशानभूमीची समस्या सोडवण्यासाठी शासन निष्क्रिय आणि उदासीन दिसत आहे. 

त्यामुळेच आर .पी. आय. चे धडाडीचे नेते यासाठी लढा देत आहेत .तरीही सरकार याकडे लक्ष देत नसल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आठवले गट उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने जिल्ह्यातील तमाम आर.पी.आय. आणि आंबेडकर प्रेमी  अनुयायी बरोबर घेऊन सरकारला जागे करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे अवचित के साधून 26 जानेवारी 2024 रोजी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी फाट्या नजीक सकाळी 11 वाजता भव्य रास्ता रोको  आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले देण्यात आले असून कोंडी आणि पंचक्रोशीतील समाज बांधवांनी या रास्ता रोको आंदोलनासाठी सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.  या संदर्भात आपली भूमिका मांडताना  जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर रवी गायकवाड म्हणाले, " निधी मंजूर असताना सुद्धा दलित बांधवांच्या स्मशानभूमीसाठी केवळ जागा मिळत नाही. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी दलित समाजाला न्याय मिळत नसेल तर आणखी किती दिवस सहन करायचं...? माणसाला माणूस म्हणून गावामध्ये न्याय मिळत नसून एका शेतकऱ्याच्या आडमुठ्यापणामुळे आमच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळेच आम्ही आता आरपारची लढाई म्हणून रास्ता निर्णय घेतला असून शासनाने त्वरित दलित बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन मी आरपीआयच्या वतीने करतोय. 

सामाजिक परिवर्तन हाच आमचा संकल्प ही विचारधारा घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या माध्यमातून विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन उभा केले असून  आता माघार न घेता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांनी केलंय.

या पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस शामसुंदर रवी गायकवाड, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष तात्यासाहेब काळे, युवक अध्यक्ष बाबासाहेब जगताप, संघटन सचिव दत्ताभाऊ वाघमारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रामजी गायकवाड, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जीवन हिप्परकर,  नानासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments