मराठा आंदोलना दरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार :- दास शेळके (समन्वयक मराठा क्रांती मोर्चा) - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 22, 2024

मराठा आंदोलना दरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार :- दास शेळके (समन्वयक मराठा क्रांती मोर्चा)

 मराठा आंदोलना दरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार 

- दास शेळके (समन्वयक मराठा क्रांती मोर्चा)

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्या विषयी अपशब्द वापरू नये अन्यथा खंडोबाच्या आसुडणे त्यांची जीभ  हसडू :- सुनिल रसाळे (समन्वयक मराठा क्रांती मोर्चा)

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी साठी अंतरवली सराटी ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे. 26 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे हि यात्रा धडकणार आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्याना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली. मराठा आंदोलना दरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दास शेळके यांनी दिला तर मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्या विषयी अपशब्द वापरू नये अन्यथा खंडोबाच्या आसुडणे त्यांची जी हसडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनिल रसाळे यांनी दिला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष पदी माजी नगरसेविका लता फुटाणे यांची निवड करत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी आबा सावंत, सुनिल सुरवसे, सुनिल हुंबे, विश्वास चव्हाण, धर्मराज भोसले, बाबा शेख, गणेश सरोळे, संतोष जाधव, शेखर फंड, निलेश शिंदे, अमित माने, कृष्णा थोरात, अक्षय शिंदे, ओंकार निंबाळकर, सचिन गोडसे, संजय घाडगे, दिनेश माने, राजाराम पवार, संभाजी शितोळे, निरंजन नवघिरे यांच्यासह युवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages