Ads

Ads Area

सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीचे सिंचन भवन समोरच चक्री उपोषण.....! शासन निर्णयाला केराची ची टोपली दाखवल्यामुळेच कर्मचारी प्रशिक्षणापासून वंचित....!! न्याय मिळेपर्यंत करणार उपोषण...!!!

 सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीचे सिंचन भवन समोरच चक्री उपोषण.....!

शासन निर्णयाला केराची  ची टोपली दाखवल्यामुळेच कर्मचारी प्रशिक्षणापासून वंचित....!! 

न्याय मिळेपर्यंत करणार उपोषण...!!! 


सोलापूर (कटूसत्यवृत्त): -सरकारी आदेशाची पायमल्ली झाल्यामुळेच प्रशिक्षणासाठी न पाठवलेल्या स्थापत्य अभियंता सहाय्यक संवर्गातील कारकून ,मिस्त्री आणि लिपिक  आदी 13 पदावरील कर्मचाऱ्यांना  वय वर्ष 45 झालेल्यांना सूट देऊन स्थापत्य अभियंता सहाय्यक पदावर  01/01/ 1989  पासून समावेशन करणे क्रमप्राप्त असताना याकडे डोळेझाक केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून न्याय मागण्यासाठीच सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीच सिंचन भवन समोर चक्री उपोषण करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष एम.  एस.  देवकते यांनी दिली. 

सचिव बाबासाहेब झेंडे म्हणाले ," सर्व कर्मचारी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असताना देखील शासनाने त्यांना प्रशिक्षणाला पाठवले नाही. त्यामुळे हे सर्व कर्मचारी पाच महिन्याच्या प्रशिक्षणापासून वंचित राहिले असून शासन निर्णय तसेच औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठाच्या निकालाप्रमाणे कोणत्याच प्रकारची कार्यवाही न केल्यामुळेच या कर्मचाऱ्यांना न्यायापासून वंचित राहावे लागले आहे. 

वय वर्ष 45 ला विषय व प्रशिक्षण सूट देण्याचा निर्णय झालेला असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळेच कर्मचारी कृती समिती आपल्या मागण्यांसाठी ठाम झाले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा चंग या कृती समितीने बांधलेला आहे.

दिनांक 18/06/1998 , 08/08/2001, आणि  31/07/2013  या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णय नुसार अंमलबजावणी होणे आवश्यक होते. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून शासन निर्णय व मॅट निर्णय चा अंमलबजावणी न केल्यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांवर आज उपोषण करण्याची वेळ आली आहे. 

शासनाने आपला शब्द न पाळल्यामुळेच वयोवृद्ध सेवानिवृत्त आणि आजाराने त्रस्त झालेले असताना सुद्धा सिंचन भवन कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ यांच्यावर आली आहे.  अ.  अभियंता सक्षम अधिकारी असताना देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास न देता दिलासा द्यावा.  आणि हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे सेवानिवृत्त स्थापत्य अ. सहाय्यक व क्षेत्रीय कर्मचारी कृती समिती सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग यांच्या वतीने सरकारकडे न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली असून लवकरच सरकारने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या निवेदनाद्वारे या सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 

यावेळी अध्यक्ष  एम. एस.  देवकते, उपाध्यक्ष ए.  व्ही .जोशी, कार्याध्यक्ष सी.  आर.  होनमाने, सचिव बाबासाहेब झेंडे, सहसचिव एन .एल . मंझिली, कोषाध्यक्ष एस ,एस,  फुलारी, सोलापूर शहराध्यक्ष एम .के. सोनकांबळे,व्ही.जी .कमलाकर, खजिनदार फुलारी, कोनापुरे जेऊरकर, जोशी आणि इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक कर्मचारी कृती समितीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेने वज्रमु आवळली 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close