राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर विद्यार्थी अध्यक्ष पदी पवनकुमार पाटील यांची निवङ....विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 26, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर विद्यार्थी अध्यक्ष पदी पवनकुमार पाटील यांची निवङ....विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर विद्यार्थी अध्यक्ष पदी पवनकुमार पाटील

 यांची निवङ....विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व सोलापूर शहर -जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार  विद्यार्थी  प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर विद्यार्थी अध्यक्ष पदी पवनकुमार पाटील यांची नियुक्ती केली.पक्ष संघटन वाढीसाठी व राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली.या नियुक्ती मुळे विद्यार्थ्यांमध्ये  जल्लोषाचे वातावरण पहायला मिळत आहे.याबाबतचे नियुक्ती पञक युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी मेलद्वारे सोलापूर शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांना पाठवले .व नियुक्ती पञक शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी गुरुवारी नूतन विद्यार्थी शहर अध्यक्ष पवनकुमार पाटील यांना सुपूर्द केले.या निवङ प्रक्रियेबद्दल शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पवनकुमार पाटील यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पक्षातील सर्वच फ्रंटल सेलच्या प्रमुख पदाधिकारी यांनी पवनकुमार पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


या नियुक्ती सोहळ्या प्रसंगी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव ,सामाजिक न्याय अध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु,वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी ,सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,दत्ता वाघमोङे,दशरथ शेंङगे,बाबा देवकर,ओकांर ङबरे ,अविनाश खराटे ,रोहीत रेङ्ङी ,विजय रेङ्ङी ,रवी हिरोळे ,महेश कोळी,रुतुज वरकट्टे,अक्षय वरकट्टे,ओंकार माने , यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार गोपीचंद पङळकरांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय समर्थक पवनकुमार पाटील यांचा शहर-जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश व नूतन विद्यार्थी अध्यक्ष पदी निवङ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages