स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मार्डीमध्ये अभिवादन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 12, 2024

स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मार्डीमध्ये अभिवादन.

 स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मार्डीमध्ये अभिवादन.

मार्डी (कटूसत्य वृत्त):- स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त व आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे आध्यात्मिक गुरु, युगपुरुष ,युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मार्डी येथे निर्मल हृदय दादा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय खरटमल यांच्या वतीने डॉक्टर भोजने पब्लिक स्कूलचे संस्थापक डॉ. चित्तरंजन भोजने यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव गवळी सर, मार्डीचे उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, सोलापूर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी सोनार, दादासाहेब पाटील ,पृथ्वीराज माने युवा मंच उत्तर सोलापूर सचिव भगवान तात्या कदम, अजित पाटील, बाबुराव काशीद ,चंद्रकांत नारायणकर, बाळू अकोलकर ,यश खरटमल आदी जण ‌उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages