Hot Posts

6/recent/ticker-posts

खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ काळे कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी

 खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ काळे

कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ काळे यांची निवड करण्यात आली. खड्डा तालीम श्री शिवमंदिर येथे झालेल्या बैठकीत शिवजयंतीनिमित्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. दिवंगत सुनील कामाठी यांचे वारसा शिवकुमार सुनील कामाठी यांनी पुढे नेत आहे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती च्या अवचित्य साधून खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाचे बैठक आयोजित करण्यात आले . बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूर्तीला पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आले.  या बैठकीत प्रास्ताविक कृष्णा सुरवसे यांनी केले.

खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने भक्तमय वातावरणात साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षीही तोच जोश तोच आकर्षण असल्याचे मान्यवरांनी सांगितल.

शिवकुमार कामाठी यांनी या निवडी जाहीर केल्या. मंडळाचे उत्सव पदाधिकारी पुढीलप्रमाणे : कार्याध्यक्ष - कृष्णा सुरवसे, आनंद चौगुले उपाध्यक्ष - अंबादास विटकर, विकी जाधव, खजिनदार - प्रशांत उंबरे, राज मंजुळकर, सचिव‌ - दत्ता साळुंखे, आकाश चव्हाण, सहसचिव - मनोज बनसोडे, विकी पवार, लेझीम प्रमुख - प्रवीण वाडेकर, रमेश विटकर, गणेश भोसले, मिरवणूक प्रमुख - मनोज चव्हाण, शुभम शिंदे, राकेश कोरे, सोशल मीडिया प्रमुख - ऋषिकेश पांढरे, निखिल बिराजदार, सागर पवार (नायडु), पुजा प्रमुख - शुभम माने, रोहीत पवार. याप्रसंगी खड्डा तालीम महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments