Ads

Ads Area

भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन

 भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर ही भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत संशोधन मुल्यमापन पडताळणी व आद्यरेखा कृषि विस्ताराचे काम करणारी यंत्रणा आहे. सन २००९ पासून कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर मार्फत सर्व कृषि व कृषिपुरक विभागांच्या समन्वयातून दरवर्षी रब्बी हंगामामध्ये कृषि तंत्रज्ञान महोत्सव आयोजित करत असते. यावर्षी कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १६ व १७ जानेवारी, २०२४ या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे १६ व्या भव्य कृषि तंत्रज्ञान महोत्सव-२०२४ चे आयोजन करण्यात आलेले आहे.

कृषि तंत्रज्ञान महोत्सवा अंतर्गत दिनांक १६ व १७ जानेवारी, २०२४ या कालावधीत सोलापूर-बार्शी रोडवरील केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष पिक प्रात्यक्षिक आयोजनही केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पौष्टीक भरडधान्य भगर, राळा, वरई, ज्वारी, हुरडयाची लाहयाची ज्वारी, तृणधान्यामध्ये गहू, मका, स्वीटकॉर्न, कडधान्यामध्ये हरभरा, तेलबियामध्ये करडई, मोहरी इ. पिकांचे सुधारीत / संकरीत वाणांची लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला पिकांमध्ये ढोबळी, टोमॅटो, मिरची, व कलिंगड खरबूज, भेंडी, वांगी, पालक, मेथी, ब्रोकोली, कोबी, बीट, गाजर इत्यादी तर झेंडू, डाळिंब इत्यादी पिकांचे सुधारीत व संकरीत वाण पहावयास मिळणार आहेत. विविध चारा पिके, सकरित नेपियार, अर्जनधास, दशरथ, लसूणघास, कडवळ इत्यादिचे विविध वाणांची लागवड करण्यात आलेली आहे, एकूण ३१ पिकांमधील ५३ बाण व आधुनिक शिफारशीवर आधारित कृषि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आयोजित केलेली आहेत. सदरिल पिंक प्रात्यक्षिकामध्ये विविध कृषि निविष्ठांच्या वापराचे परिणाम तुलनात्मकरीत्या शेतक-यास प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रक्षेत्रावर दिनांक १६ व १७ जानेवारी, २०२४ या कालावधीत कृषि शास्त्रज्ञ मार्गदर्शकासह उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत. नावीन्यपूर्ण क्यु. आर. कोड तंत्रज्ञान आधारीत कृषि तंत्रज्ञान माहिती बोर्ड व्दारे सुधारीत तंत्रज्ञान महिती व व्ही.डी. ओ. ब्दारे उपलब्ध, जीजाई नॅनो किचन गार्डन युनिट व्दारे फक्त २४ चौरस फुटामध्ये ११ ते १३ प्रकारचा भाजीपाला शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने उत्पादन प्रात्यक्षिक, कृषि निविष्ठा, जैविक निविष्ठा, बीज प्रक्रिया युनिट, निबोळी पावडर प्रकल्प, ट्रायकोडर्मा व मेटा- हाईझीयम उत्पादन प्रकल्प, गांडुळ खत, ज्वारी प्रक्रिय युनिट आवश्यक साधने, सुधारीत जातींचे बियाणे तसेच डाळिंब, ज्वारी व सोयाबीनचे प्रक्रियायुक्त पदार्थ इत्यादी माहिती प्रदशर्शीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन मंगळवार दि. १६ जानेवारी, २०२४ रोजी सोलापूरचे खासदार  जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुभहस्ते होणार आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक दशरथ, एल. तांभाळे प्रमुखख पाहुणे म्हणून तर विशेष उपस्थिती म्हणून हरीयाना नैसर्गिक शेती प्रकल्पाचे समन्वयक डॉ. हरीओम हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष  प्रदिपजी गायकवाड भुषविणार आहेत.अशी माहिती पत्रकार परिषदेत लालासाहेब तांबडे यांनी दिली याप्रसंगी प्रदीप गोंजरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close