संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 12, 2024

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन.

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन. 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयामध्ये जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी हजारो वर्षांच्या जातीधर्माच्या शृंखला तोडून मोठ्या उदात्त व व्यापक हेतूने गोरगरीब,कष्टकरी,वस्तुनिष्ठ,श्रमकरी,शेतकरी,वंचित,दुर्बल घटकांना हक्काधिकार देऊन,त्यांना स्वराज्य या देशकार्यासाठी प्रेरित करून अखंड मानव जातीसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या जागतिक प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊ होते असे मनोगत व्यक्त केले

जिजाऊ च्या वेशभूषा केलेली जान्हवी भोसले ज्योती शिंदे सिताराम बाबर अरविंद शेळके शेखर कंठीकर रमेश चव्हाण रवी शिरगरी बबन डिंगणे रुपेश किरसावंगी विश्वनाथ आमाने सिद्धाराम कोरे  महेश गुप्याड भारत बडवणे ज्ञानेश्वर पवार आप्पा मोरे सिद्धू पाटील आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages