ध्वजदिन निधी संकलनाचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 1, 2023

ध्वजदिन निधी संकलनाचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ

 ध्वजदिन निधी संकलनाचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024 संकलनाचा शुभारंभ गुरूवार दि 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी ध्वजदिन 2022 व 2023 निधी संकलनाचे उत्कृष्ठ संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक वितरण समारंभ ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली आहे.      जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमासाठी सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल उगले-तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवास  उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.      तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख जिल्ह्यातील माजी सैनिक,/विधवा/ वीरमाता पिता व वीरपत्नी यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय बहुउद्देशीय सभागृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर तुंगार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages