मराठा आरक्षणासाठी छावा स्मशानभूमीत सरणावर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

मराठा आरक्षणासाठी छावा स्मशानभूमीत सरणावर

 मराठा आरक्षणासाठी छावा स्मशानभूमीत सरणावर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठ्यांच जीवन चितेप्रमाणे राख करणार्याज राज्य सरकारच्या निषेधार्थ व मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे व प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे सरणावर झोपून तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये बेमुदत जिवंत चित्ता समाधी आंदोलन करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की..., गेल्या 70 वर्षापासून मराठा समाजाला कोणतेही शासकीय लाभ, सवलती किंवा फायदे मिळाले नाहीत, आरक्षणा अभावी मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला आहे. त्यामुळे मराठ्यांना संवैधानिक आणि घटनात्मकरित्या टिकणारे ओबीसी आरक्षण द्यावे, यासाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार आणि तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी सातत्याने शासनाकडे यापूर्वीही पाठपुरावा केलेला आहे. त्या मागणीला राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच केंद्र व राज्य शासन मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत व मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र व राज्य शासनाचा निषेधार्थ व मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठा जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये जिवंतपणी चित्ता समाधी घेवून बेमुदत आंदोलनास बसले आहेत. तसेच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत काळाकरिता चालू राहणार आहे.

यावेळी चिता आंदोलकर्ते रतिकांत पाटील यांना पाठींबा देण्यासाठी छावाचे निखिल गोळे, योगेश पवार, विशाल भोसले, अंकुश पाटील, नीतेश दातखिळे, अमर सुपे, संदीप सिंग, संजय पारवे, विश्वजित चुंगे, गणेश मोरे यांसह मराठा समाज व तळे हिप्परगा ग्रामस्थ, जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौध्द समाज, वडार समाज, कोळी, पारधी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages