नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

 नागरी बँक्स असोसिएशनच्या  वतीने कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज बँकींग क्षेत्रात सातत्याने आमूलाग्र बदल होत असून भयंकर स्पर्धा निर्माण झाली आहे. नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे बदलत आहेत. या सर्व बाबींची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणे आवश्यक आहे. उद्देशाने नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने दर महिन्याला प्रशिक्षणाचे आयोजन केले जात असल्याचे नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय संचालक दीपक मुनोत यांनी करून दिला. पुढे चेअरमन लुणावत म्हणाले की, एखाद्या बँकेला कामकाजाबाबत उल्लेखनीय यश मिळाले किंवा नेत्रदिपक प्रगतीमुळे पुरस्कार मिळाला तर पदाधिकारी व संचालकांचे भरपूर कौतुक होते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले पाहिजे. त्यामुळे त्यांची काम करण्याची उर्जा वाढते. यावेळी बँकिंग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक धनंजय वडापूरकर यांनी स्वयंशिस्त, सकारात्मक दृष्टिकोन व परिणाम आणि बँकेच्या प्रगतीतील सहभाग या विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात निवृत्त व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी वेळेचे व्यवस्थापन, स्वयंप्रेरणा व दैनंदिन कामकाजावरील परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी राजगोपाल मणियार, नंदकुमार दुड्डम, शुभांगी ढवळे, दिनकर देशमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages