मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी बाळराजेंच्या नेतृत्वाखाली अनगर फाटा येथे रास्ता रोको - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी बाळराजेंच्या नेतृत्वाखाली अनगर फाटा येथे रास्ता रोको

मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी बाळराजेंच्या

नेतृत्वाखाली अनगर फाटा येथे रास्ता रोको 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्वकर्ते असलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा लोकनेते कारखान्याचे चेअरमन, बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज यावली परिसरातील अनगर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. राज्य शासनाने मराठा समाज बांधवांच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ मराठा समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी बाळराजे पाटील यांनी केली. डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवे उपरणे असलेले हजारो युवक या चौकात एकत्र येऊन या भव्य रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.यावेळी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे-पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा मराठा समाज बांधवांनी यावेळी दिल्या. यावेळी महसूल प्रशासनाच्या प्रतिनिधींना मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी झालेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूर आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची मोठी रांग या परिसरात लागली होती. यावेळी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

या रास्ता रोको आंदोलनामध्ये मराठा समाजाबरोबर इतर समाजाचे युवक देखील मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये मराठा समाज बांधवांसोबत आम्ही देखील आहोत, अशी ग्वाही यावेळी या युवकांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages