जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत राजकारण नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत राजकारण नाही

 जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत राजकारण नाही


अगोदर मी मराठा आहे नंतर राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. आज मराठा समाज व मनोजजरांगे पाटील साहेब यांच्यासोबत राहणे काळाची गरज आहे, मराठा समाजाला मिळत नसलेल्या आरक्षणामुळे ही भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयवरील शिवसेना पक्षाचे फलक काडून मराठाक्रांती मोर्चाचे फलक लावले. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेऊन आरक्षण देतो असे अस्वाशीत केलेले असून ते दिलेला शब्द पाळतीलही असा मला विश्वास आहे. परंतु सध्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवना-मरणाचा प्रश्न व असंख्य मराठा बांधवांचे होत असलेले बलिदानामुळे मी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजासोबत उभे राहण्याची भूमिका घेत आहे. माझ्यासोबत इतर OBC शिवसैनिक व मराठा शिवसैनिक यांची ही हीच भूमिका असून मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकारणात सहभागी होणार नाही. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळून न्याय मिळेल अशी आशा आहे आणि ते आपण पूर्ण करावी.

अमोल (बापू) शिंदे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages