अभय योजना – २०२६ अंतर्गत १०० टक्के दंड व व्याज माफीची सुवर्णसंधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

अभय योजना – २०२६ अंतर्गत १०० टक्के दंड व व्याज माफीची सुवर्णसंधी

 अभय योजना – २०२६ अंतर्गत १०० टक्के दंड व व्याज माफीची सुवर्णसंधी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या मेजर गाळेधारक, मिनी गाळेधारक, खुली जागाधारक, अधिकृत खोकेदार, बीओटी गाळेधारक, १५६ गाळेधारक तसेच टी.पी. ३/२३ अंतर्गत येणाऱ्या सर्व भाडेकरूंसाठी "अभय योजना – २०२६" लागू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत १०० टक्के दंड व व्याज माफी देण्यात येणार आहे. ही योजना दि. ०६ जुलै २०२६ ते दि. ३१ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनुसार संबंधित भाडेकरूंनी मार्च २०२६ अखेरपर्यंतची सर्व थकबाकी तसेच सन २०२६-२७ च्या सहामाहीचे भाडे निर्धारित कालावधीत भरल्यास त्यांना थकीत रकमेवरील १०० टक्के दंड व व्याज माफ करण्यात येणार आहे.
यासाठी लाभार्थ्यांनी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे –
मार्च २०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी भरावी.
सन २०२६-२७ च्या सहामाहीचे भाडे अदा करावे.
सर्व रक्कम एकरकमी भरावी. थकबाकीची रक्कम धनादेश द्वारे द्यावयाचे झाल्यास दिनांक 28 -7 -2026 चे पूर्वीचे धनादेश असावा.महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व संबंधित गाळेधारक, खुली जागाधारक, अधिकृत खोकेदार व भाडेकरूंना आवाहन करताना सांगितले की, "महापालिकेने नागरिकांच्या हिताचा विचार करून ही विशेष अभय योजना लागू केली आहे. १०० टक्के दंड व व्याज माफीची ही दुर्मिळ संधी असून सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत थकीत रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यावा. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित महापालिकेच्या संबंधित विभागात संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी."
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसेच संबंधित समिती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, प्रशासनालाही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाची सूचना : भाडे व SGST तसेच CGST ची संपूर्ण रक्कम दि. ०६/०७/२०२६ ते ३१/०७/२०२६ या कालावधीत महानगरपालिकेच्या कार्यालयात भरल्यासच १०० टक्के दंड व व्याज माफीचा लाभ मिळणार आहे. मुदत संपल्यानंतर या सवलतीचा लाभ मिळणार नसल्याने सर्व संबंधितांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages