महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी चे तब्बल १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक.
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व प्राथमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६' चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील एकूण १७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून 'शिष्यवृत्ती धारक' होण्याचा बहुमान मिळवला आहे. आणि तब्बल 75 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण टेंभुर्णी परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यालयातील गिरमकर समृद्धी संदीप, ढवळे प्रणाली नितीन, भालेराव अंजली रोहिदास, गरड विनायक लक्ष्मण, शिंदे अंजली चंद्रकांत, गायकवाड जान्हवी विजय, जाधव वैष्णवी मकरध्वज, भानवसे श्रावणी सुनील, सटाले श्रेया महादेव, मस्के कृष्णप्रिया संतोष, देशमुख साद जफर, बनकर तृप्ती उल्हास, जगताप समृद्धी धोंडिराम, साळुंखे अभिनव प्रमोद, माळी रुद्रप्रताप गणेश, नागटिळक स्वरा अच्युत, खोचरे रणवीर रणजित हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक म्हणून पात्र ठरले आहेत.
स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रतीक कुटे, सोहम व्यवहारे, मीनल कुटे, प्रियंका हावळे, माऊली पवार, वैभव चव्हाण ,अनिता भालेराव, रूपाली साळुंखे या शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार जयकुमार गोरे, माढा तालुक्याचे विद्यमान आमदार मा. अभिजीत (आबा) पाटील, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा. श्री. रणजीत भैय्या बबनरावजी शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती मा. ऍडव्होकेट अमृताताई वाघे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नारायण भानवसे, विद्यालयाचे प्राचार्य विजय यादव, मुख्याध्यापक शोएब बागवान, शिक्षक-पालक संघ, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

No comments:
Post a Comment