एमपीएससी परीक्षा व इतर भरती परीक्षा एकाच सत्रात घेण्यात यावी- खा. मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट-क २०२६ तसेच इतर भरती परीक्षा ऑनलाइन (CBT) व बहु-सत्र (Multi-Shift) पद्धतीऐवजी ऑफलाइन (OMR) व एकाच सत्रात घेण्यात यावी अशी मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा गट-क २०२६ संदर्भात गंभीर आक्षेप आहेत. परीक्षा ऑनलाइन (CBT), बहु-सत्र (Multi-Shift) पद्धतीने व नॉर्मलायझेशनच्या आधारे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांचा विरोध हा ऑनलाइन तंत्रज्ञानाला नसून बहु-सत्र परीक्षा, नॉर्मलायझेशन पद्धत आणि परीक्षा प्रक्रियेत खासगी कंपन्यांच्या सहभागाला आहे. प्रत्येक उमेदवाराला समान प्रश्नपत्रिका, समान संधी व पारदर्शक मूल्यमापन मिळणे ही न्याय्य भरती प्रक्रियेची मूलभूत अपेक्षा आहे असे म्हणाले.
तर संयुक्त पूर्व परीक्षा गट-क २०२६ ऑफलाइन (OMR) व एकाच सत्रात घेण्यात यावी.
नॉर्मलायझेशन पद्धतीचा वापर टाळण्यात यावा.
परीक्षा प्रक्रियेत खासगी कंपन्यांचा सहभाग टाळून MPSC च्याच थेट नियंत्रणाखाली परीक्षा घेण्यात यावी.
भविष्यातील सर्व MPSC भरती परीक्षा ऑफलाइन, एकाच सत्रात व पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यात याव्यात अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
.png)
No comments:
Post a Comment