अशोककाका लुणावत यांनी कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले - आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 2, 2023

अशोककाका लुणावत यांनी कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले - आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड

 अशोककाका लुणावत यांनी कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले

 - आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड

नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत यांचा सत्कार


माढा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील दारफळ सीना येथील एका माजी सैनिकाच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोककाका लुणावत यांनी प्रामाणिक प्रयत्न,जिद्द,चिकाटी, चांगल्या विचारी लोकांची संगत, दर्जेदार पुस्तके व साहित्याचे वाचन व कष्टाच्या जोरावर बँकींग,व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यशाचे शिखर गाठल्याचे गौरवोद्गार विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी काढले आहेत.

ते माढा येथे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन तथा माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक काका लुणावत यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी बोलत होते.

यावेळी मराठा समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे साठे म्हणाले की, चेअरमन अशोक लुणावत हे गोरगरीब व गरजूंना मदत करणारे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व आहेत.आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काकांनी माढेश्वरी बँकेची नेत्रदिपक प्रगती केली आहे.बँकेच्या माध्यमातून मागील 15 वर्षांपासून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तसेच संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून माढा शहरात कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयाची केलेली सुरुवात ही समाजोपयोगी कामे समाज कधीही विसरू शकणार नाही.यापुढेही त्यांनी बँकींग क्षेत्रातील कामाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध स्तुत्य व विधायक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माढेश्वरी अर्बन मल्टिपल निधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मोरे,संचालक गणेश काशीद,बाळासाहेब चव्हाण,अभिजित लुणावत, पोलीस कॉन्स्टेबल विजय घोगरे, आण्णासाहेब खंडागळे,राहूल शेटे,जोतीराम घळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages