मराठा आरक्षण विरोधी वाचाळ नेत्यांना जोडो मार आंदोलन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 2, 2023

मराठा आरक्षण विरोधी वाचाळ नेत्यांना जोडो मार आंदोलन.

 मराठा आरक्षण विरोधी वाचाळ नेत्यांना जोडो मार आंदोलन.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जुळे सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने विजापूर रोडवरील अशोक नगर येथील चौकात मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या वाचाळ वीरांना महिलांच्या हस्ते चपलीचा चोप देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मराठा समन्वयक प्रशांत बाबर यांनी आरक्षणासाठी गेल्या तेरा दिवसामध्ये २५ ते २७ जणांनी आत्महत्या केली पण भावनाशून्य व निर्दयी सरकारला याचे गांभीर्य नाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर जरांगे पाटील यांनी केलेली टिका सहन न झाल्याने त्यांचे लाळघोटे कार्यकर्ते बिळातून बाहेर येवून जरांगे पाटील व मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत हे मराठा समाज कधीही खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळलेल्या कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यावी अन्यथा मराठा समाज ते वाचाळवीर दिसतील तिथे मराठा स्टाईलने समजवतील हे त्यांनी लक्षात ठेवावे  असे मत व्यक्त केले

या प्रसंगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली विजापूर नाका पोलीस स्टेशन च्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता  यावेळी प्रशांत बाबर मानाजी माने चेतन चौधरी सुशांत वाकचौरे महेश घाडगे श्याम कदम रवी मोहिते श्रीकांत मेळगे पाटील विकास कदम पोपट भोसले राजाभाऊ कुसेकर संकल्प जगदाळे नरेश घोरपडे सिताराम बाबर किरण माने राहुल पाटील मनीषा नलावडे सुनंदा साळुंखे लता ढेरे लक्ष्मी माने स्वीटी कुसेकर रोहित तळवळकर सचिन गोडसे शशिकांत शिंदे प्रविण शिंदे दत्ता जाधव शाम कदम आधी सह मराठा समाज बांधव उपस्थित होता

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages