मोहोळ -अर्जुनसोंड येथे "मराठा कुणबी" शाळा सोडल्याचा दाखला: हाच पुरावा ग्राह्य धरुन सरसकट ओबीसी दाखले द्यावेत. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

मोहोळ -अर्जुनसोंड येथे "मराठा कुणबी" शाळा सोडल्याचा दाखला: हाच पुरावा ग्राह्य धरुन सरसकट ओबीसी दाखले द्यावेत.

 मोहोळ -अर्जुनसोंड येथे "मराठा कुणबी" शाळा सोडल्याचा दाखला: हाच

 पुरावा ग्राह्य धरुन सरसकट ओबीसी दाखले द्यावेत.

पोखरापूर  (कटूसत्य वृत्त):-राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी व पुरावे शोधण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. दरम्यान मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथे "हिंदू मराठा-कुणबी "उल्लेख असलेला एका‌ व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला आढळून आला असून त्या आधारावर "मराठा-कुणबी" प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे मोहोळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांना दिले आहे.

सदर मराठा कुणबी दाखल्याचा भक्कम ‌‌ पुरावा ग्राह्य धरुन  मोहोळ तालुक्यातील सर्व मराठा समाजासह सोलापूरसह  राज्यातील सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी ‌निवेदनाद्वारे‌ केली आहे. मराठा आरक्षणासाठी‌‌ मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.  गरजवंत मराठ्यासाठी ते लढत आहेत. सरकारने मराठा कुणबी समाजाला अर्धवट आरक्षण देऊ नये, राज्यातील मागणी करणा-याच  मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेच पाहिजे.यासाठी‌ समाज आक्रमक पवित्रा घेत आहे.या समाजाचा अंत ‌ पाहू नये असेही या निवेदनात म्हटले आहे.  यावेळी अर्जूनसोंडचे सरपंच शुक्राचार्य हावळे, माजी सरपंच तुळशीराम हावळे,माजी प्राचार्य श्रीधर ‌उन्हाळे, आशिष आगलावे, विजय कोकाटे, अरुण भोसले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages