शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेल्या मोकाट कुत्रीची उपमा देत फोटोला काळे फासले* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 30, 2023

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेल्या मोकाट कुत्रीची उपमा देत फोटोला काळे फासले*

 शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेल्या

 मोकाट कुत्रीची उपमा देत फोटोला काळे फासले*

  सोलापुरात महिला आघाडीने केला निषेध व्यक्त ....!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेली मोकाट कुत्री, भटक भवानी, सोलापूरचा  कलंक... अशी उपमा देत कुत्रीच्या गळ्यात वाघमारे यांचा फोटो लावून शेण व काळे फासून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. गेली तीन-चार महिन्या पासून शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे हे आपल्या बेताल वक्तव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे ,शिवसेना नेते संजय राऊत , उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका टीपणी करीत आहेत. त्याचा सोलापूर शिवसेना महिला आघाडीने खरपूस समाचार घेतला.

        ज्योती वाघमारे ह्या "घरमोडे" आहेत, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडणारी विधाने करून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालविला आहे,  ही "घरमोडे "बाई  सोलापूरला लागलेला एक कलंक आहे ,"घरमोडे "बाई मुर्दाबाद... अशा घोषणा  महिलांनी दिल्या.शिवाय त्यांच्या पोस्टरला शेण लावून, काळे फसले.. तसेच या बेताल बाईचा तात्काळ बंदोबस्त पोलिसांनी  करावा अन्यथा गाठ आमच्याशी आहे, अशी तंबी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर महिला आघाडीने दिली आहे. ठाकरे परिवार आमचे श्रद्धास्थान आहे, ज्योती "घरमोडे" यांनी त्यांच्याविषयी विषयी अपशब्द वापरले आहेत, त्यांना आम्ही कदापिही माफ करणार नाही, संस्कृतीची चाड नसणाऱ्या बाईला ठाकरे परिवारावर बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही, बुद्धूहृदय सम्राट असे संबोधन करून देखील " घरमोडे "बाईने  महाराष्ट्राचा अपमान केला आहे .ह्या "घरमोड्या "बाईपासून शिंदे गटाच्या  नेत्यांनी देखील स्वतःचे घर सांभाळावे,अन्यथा नवी नौबत त्यांचेवर येईल अशा तीव्र शब्दात ज्योती वाघमारे यांचा निषेध केला .हा कार्यक्रम अक्कलकोट रोड पुर्व भाग सोलापूर शहर येथे बुधवारी ३०नोव्हे.२३रोजी घेतला. 

      यावेळी महिला संघटिका प्रीती नायर, युवती सेना अधिकारी पुजा खंदारे,छाया वायदंडे ,मंगल थोरात ,शशिकला चिवडशेट्टी ,सुनीता लोंढे ,स्वाती रुपनर, मीना सुरवसे, प्रभावती येलगुंडे ,जोहरा रंगरेज ,आदीसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages