Ads

Ads Area

कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात ११ शस्त्रक्रिया यशस्वी!

 कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात ११  शस्त्रक्रिया यशस्वी! 



कळंव (कटूसत्य वृत्त):- उपजिल्हा रुग्णालयात  दि .  ३० रोजी  येथे ४ शस्त्रक्रिया द्वारे प्रसुती,  ४ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,  २ गर्भपात शस्त्रक्रिया,  व १  स्तनातील गाठीचे शस्त्रक्रिया  अशा एकुण ११ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आजवर आशा शत्रक्रिया कधीतरी होत होत्या . पण काही दिवसापूर्वी नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागनाथ धर्माधिकारी यांनी रुग्णालय व संबंधित परिसराचा अभ्यास करून  रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचा कार्यक्रम एक कलमी राबवण्याचे ठरवले त्यातच आज विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या व त्यांनी तातडीने याची दखल घेत या सर्व अकरा रुग्णावर यशस्वीरित्या विविध आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या , यामध्ये  शस्त्रक्रिया उपक्रमासाठी प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ मंजुराणी शेळके, स्री रोग तज्ञ  डॉ सायस केंद्रे, डॉ सी.बी लामतुरे,  डॉ प्रियंका जाधवर, भुलतज्ञ डॉ अंकुश पवार,  व बालरोग तज्ञ  डॉ पुरुषोत्तम पाटील, तर नर्स म्हणून जावरकर ,उगलमोगले  , बनकर ,चव्हाण , पारवे, यांनी  परीश्रम घेतले. तरी या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त करून परिसरातील रुग्णांना यापुढे चांगली सुविधा देण्यात येईल असेही यावेळीरुग्णालयाच्या वतीने म्हटले आहे . तर रुग्णांनी यापुढे घाबरून न जाता व इतर ठिकाणी तातडीने न जाता आपल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी यावे व मोफत उपचार करून घ्यावेत असे आव्हाने रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे .  


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close