सावळेश्वर टोल नाका प्रवाशांना सुविधा देण्यात फेल...!
टोल वसुलीत मात्र एक्सप्रेस मेल....!!
सावळेश्वर (दादासाहेब नीळ): -मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे गेल्या दहा वर्षापासून टोल नाका स्थापन करण्यात आला.या टोल नाक्यावर गेल्या दहा वर्षापासून करोडो रुपयाचा चंदा टोल नाक्याच्या व्यवस्थापकांनी वारेमाप गोळा केला. परंतु ज्या प्रवाशांच्या खिशातून प्रचंड मोठ्या प्रमाणात मलिदा वसूल केला जातो त्याच प्रवाशांना या टोल नाक्यावर स्वच्छतागृह, बाथरूम ची सुविधा नसल्यामुळे प्रवाशातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दूरचा प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना विशेषता महिलांना या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे टोल व्यवस्थापकाने या ठिकाणी त्वरित स्वच्छतागृह बांधावे. अशी मागणी सावळेश्वर येथील सर्वसामान्य जनतेचे कैवारी उमेश चंद्रकांत माने आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब नीळ यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदन देऊन सहा महिने झाले तरीसुद्धा टोल प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता या ठिकाणी असलेल्या रेडिमेड स्वच्छतागृहामध्ये पाणी आणि विद्युत पुरवठा याची सोय न केल्यामुळे यांना विचारणारा कुणीच नसल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावातील सर्वच राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी भांडतील परंतु या स्वच्छतागृहात संदर्भात एकानेही कधीच चकार शब्द सुद्धा काढला नाही. ही समस्या प्रथम उमेश माने या तरुणाच्या लक्षात आली. आणि त्याने या संदर्भामध्ये आवाज उठवलाय.
या टोल नाक्यावर स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला आणि बालकांचे प्रचंड हाल होत असल्यामुळे या ठिकाणी टोल नाका व्यवस्थापकाने ताबडतोब स्वच्छतागृह बांधकाम करावे आणि त्या ठिकाणी सर्व लाईट पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा टोल नाक्यावर लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा उमेश माने यांनी दिला आहे.
0 Comments