अवकाळीमुळे पिके मातीमोल, शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अवकाळीची पाणी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात दोन, तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या गारपीटचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. परंतु अवकाळीने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. रब्बी पिके झोपली आहे. सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पुणे जिल्हा | पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने 19 हजार शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 11 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्ष यांचं मोठ नुकसान झाले. सर्वाधिक 4817 हेक्टर नुकसान शिरूर तालुक्यात झाले. खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरुर तालुक्यात गारपीट आणि आवकाळी पावसाच्या संकटानंतर आता शेतकऱ्यांसमोर धुक्यांचे संकट आले आहे. धुक्यामुळे रोगराई निर्माण होणार आहे. त्याचा मोठा फटका पिकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.
विदर्भात फटका | वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापूस, तूर पिकाला फटका बसला आहे. पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका बसला आहे. अमरावती विभागात ३५ हजार हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक नुकसान एकट्या बुलडाणा जिल्ह्यात झाले आहे. वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वाशिममध्ये कापूस, तूर, फळपीक ज्वारी आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
0 Comments