फटाके मुक्त दिवाळीची संकल्पना
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील २३३१ विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक चंद्रकांत ढोले यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पांडुरंग शिंदे, उपप्राचार्य सीताराम बोराडे, पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर यांच्या सहकार्यातून पर्यावरण रक्षणासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरीकरण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. या संकल्प पत्रामध्ये यावर्षी दिवाळीमध्ये आपण फटाके न उडवता वाचलेल्या पैशातून छान पुस्तके, क्रीडा व संगीत साहित्य विकत घेणे आणि अनाथ, अपंग व गरजू व्यक्तींना मदत करण्याचा संकल्प केला. या संकल्प पत्रावर विद्यार्थ्यांनी स्वतःची, पालकांची व वर्गशिक्षकांनी स्वाक्षरी करून विद्यालयामध्ये जमा केली. संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार राजन पाटील, लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील व सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले

No comments:
Post a Comment