लोकमंगल शैक्षणिक संकुलामध्ये रंगभुमी दिन जल्लोषात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित लोकमंगल कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय वडाळा येथे मराठी रंगभुमी दिन विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन आणि नटराजाच्या मुर्तीचे पुजन करून करण्यात आली. स्पर्धेची सुरुवात आंतर महाविद्यालयीन स्तरावर कला प्रकारात महाविद्यालयाचे नाव उज्वल करणाऱ्या अंशुल राठोड या विद्यार्थ्याच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली. व्यासपीठावर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, लोकमंगल कृषी व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदलिंगे सर, प्रा. ज्ञानसागर सुतार इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानसागर सुतार यांनी केले. यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. अमोल शिंदे यांनी सर्व उपस्थित स्पर्धकांना व विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व आणि आपल्या सर्वांगीण विकासामध्ये कलेचा असलेला वाटा याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. यानंतर नृत्य, नाटक, एकांकिका आणि गायन अशा विविध कला प्रकारात एकूण 75 स्पर्धकांनी आपली कला सादर केली व श्रोत्यांची विशेष दाद मिळवली. या रंगभूमी दिनानिमित्त आयोजित स्पर्धांना लोकमंगल कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला. सदरील सर्व स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून प्रा.ज्ञानसागर सुतार, डॉ. तृप्ती राठोड आणि प्रा. अजित कुरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्मिता धायगुडे यांनी केले. स्पर्धेचा शेवट हा प्रा. ज्योती गायकवाड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

No comments:
Post a Comment