सुरेशकुमार राऊत यांची मोहोळच्या पोलीस निरीक्षकपदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 9, 2023

सुरेशकुमार राऊत यांची मोहोळच्या पोलीस निरीक्षकपदी निवड

सुरेशकुमार राऊत यांची  मोहोळच्या पोलीस निरीक्षकपदी निवड


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात अचानकपणे बदली करून त्यांच्या जागी पोलीस नियंत्रण कक्षातील सुरेशकुमार राऊत यांची प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती बदली पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केली. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली नियंत्रण कक्षात झाल्याने नागरिकांमधून उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. नूतन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने राऊत यांचा सन्मान करण्यात आला. तर विनोद घुगे यांना निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची सोलापूर नियंत्रण कक्षातून प्रशासकीय कारणास्तव मोहोळ पोलीस ठाण्यात तात्पुरती बदली करण्यात येत आहे असे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचोली एम.आय.डी.सी. व चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या कंपन्यात मुंबई, नाशिक पोलिसांनी कारवाई करत कोट्यावधी रुपयांचे एम. डी. ड्रग पकडले होते. व त्या टोळीचे धागेदोरे शोधत मोठी कारवाई केली होती. त्या या अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली नियंत्रण कक्षात का झाली ?, ड्रग्ज प्रकरणाचा ह्या बदलीशी काही संबंध आहे का ?, कोणत्या राजकीय पुढाऱ्यांशी काही वादविवाद झाला आहे का ? अश्या अनेक चर्चा दिवसभरात मोहोळ तहसील व पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांमधून ऐकावयास मिळत होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages