प्रदूषण मुक्त फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त अशी दिवाळी साजरी करा डॉ. योगेश डोके - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 9, 2023

प्रदूषण मुक्त फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त अशी दिवाळी साजरी करा डॉ. योगेश डोके

 प्रदूषण मुक्त फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त अशी दिवाळी साजरी करा डॉ. योगेश डोके 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- दीपावलीमध्ये फटाक्यामुळे वायु जनसत्य, प्रतिनिधी ध्वनी प्रदूषण होऊ नये. प्रदूषण मुक्त प्रदूषण, फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त अशी पर्यावरण पूरक ग्रीन फेस्टिवल सण उत्सव साजरे व्हावेत, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी मोहोळ नगरपरिषद कार्यालयाकडून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवली जाते। आहे. स्थानिक पातळीवर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू आहे. स्वच्छ सर्वे क्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४० अंतर्गत या मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद देऊन फटाके मुक्त व पर्यावरण पूरक  'अशी दीपावली साजरी करावी असे आवाहन  मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी केले अशा फटाक्यामधून नायट्रेट, नायट्राइट्स, फॉस्फेट आणि सल्फेट या आम्लधमीर्य मूलकांचा ऑक्सीडायझिंग एजन्ट म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या संयोगातून कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डायॉक्साइड यासारखे विषारी वायू शोभेच्या दारूतून निर्माण होतात. व हे वायू मानवी जीवनाला अतिशय घातक असतात. हृदयरोग रक्तदाब, अस्थमा, क्रॉनिक ब्राँकायटिस हे आजार असणाऱ्यांना हे तर जास्तच घातक आहेत. तसेच गर्भवती स्त्रिया, वृद्ध माणसे, लहान बालके यांना सुद्धा अश्या फटाक्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा जास्त धोका आहे. फटाके वाजवताना सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनाही अपचन, सर्दी-खोकला, मानसिक अशांती, डोके दुखणे ह्या व्याधी होतात. तर फटाके लावताना होणारी इजा वा अपघात हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.

असे सांगत फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रचंड ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, बहिरेपणा आणि मानसिक अशांतता या व्याधी उद्भवतात तर मनुष्यापेक्षा शेकडो पटीने हा त्रास मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांना होतो. या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक व फटाके मुक्त अशी दिवाळी साजरी करण्यासाठी भर द्यावा. याचा पुनरुच्चार मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages