माहिती कार्यालयातील अनिल नलावडे यांची पदोन्नतीने बदली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर येथे संदेशवाहक पदावर कार्यरत असलेले अनिल नलावडे यांची जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. अनिल नलावडे यांनी जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर, उप-माहिती कार्यालय, पंढरपूर येथे कामकाज केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयातील अनिल नलावडे हे अत्यंत शांत, संयमी व सहकार्याची भावना जपणारे अशी त्यांची ओळख होती. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज नलावडे यांचा निरोप सभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. वरीष्ठ लिपिक शरद नलावडे, मिलिंद भिंगारे, लिपिक संजय घोडके, तसेच शिपाई, प्रविण डफळ यावेळी उपस्थित होते. तसेच अनिल नलवडे यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
.jpg)
No comments:
Post a Comment