विझोरीच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम - प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

विझोरीच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम - प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर

 विझोरीच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम -  प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर

 अकलूज(कटूसत्य वृत्त):-विझोरी ता माळशिरस येथील दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळांनी अनावश्यक खर्चास फाटा देऊन समाजाचे हित लक्षात घेऊन विझोरी गावातील गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांना 100 रेशन कार्डचे वाटप केले हा स्तुत्य उपक्रम असल्याचे अकलूजचे प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले ते दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त विझोरी गावात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी सरपंच नामदेव काळे, मंडळाचे अध्यक्ष शैलेश राचकर ,डॉ. अजितसिंह राचकर, शंकर काळे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर उपस्थित होते

   यावेळी बोलताना प्रांताधिकारी टिळेकर म्हणाले की महसूल प्रशासनाच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या शेतकऱ्यांशी व ग्रामीण भागाशी निगडित असतात यामुळे पाच लाख लोकसंख्या असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी आपणासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची गरज ओळखून आपल्या जवळ ठेवणे गरजेचे आहे नाहीतर ऐनवेळी पळापळ होते व आपली कामे खोळंबतात  नवीन रेशन कार्ड काढणे ,नाव वाढविणे, नाव वगळणे ही कामे वेळच्या वेळी करावी असे सांगितले मंडळास मदनसिंह मोहिते पाटील ,धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील , पी आय दीपरतन गायकवाड यांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या .

 दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने 200 महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून महिला व मुलींमधील हिमोग्लोबिन ,कॅल्शियम, बीपी, शुगर या तपासण्या मोफत करण्यात आल्या यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शंकर नगर येथील डॉक्टरांनी सहकार्य केले  पुणे येथील देसाई नेत्र  रुग्णालयाच्या सहकार्याने विझोरी गावातील 200 लोकांची नेत्र तपासणी करून 35 लोकांची मोतीबिंदू, तिरळेपणा व लासुरची ऑपरेशन करण्यात आली 50 गोरगरीब ,गरजू लोकांना मोफत चष्मे वाटप  तर 35 लोकांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले यासाठी डॉ उदयसिंह वाघमारे, डॉ. बबलू खरात यांचे सहकार्य लाभले रक्तदानाची गरज ओळखून  51 जणांनी रक्तदान केले रक्तसंकलनासाठी अक्षय ब्लड बँक माळशिरस चे डॉ राजकुमार वाघमोडे यांनी परिश्रम घेतले जि प शाळेतील मुलांची डोळे तपासणी करून तिळेपणा आढळणाऱ्या दोन मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली

 यावेळी तलाठी शिवाजी घाडगे , कोतवाल जालिंदर वाघंबरे, उपाध्यक्ष सचिन बोरकर, खजिनदार कामेश्वर काळे पाटील, दीपक राचकर, सोमनाथ बोरकर, वैभव मासाळ, प्रमोद गाडे, अविराज काळे ,बापूराव इंगळे विश्वजीत राचकर ,संदीप काळे पाटील, तानाजी बोरकर ,बापू मोरे, तुकाराम वावरे,गणेश भाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages