विविध उपक्रमांनी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
अकलूज(कटूसत्य वृत्त):-महर्षी वाल्मिकी यांची जयंती विविध उपक्रमांनी चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद चौंडेश्वरवाडी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन महर्षी वाल्मिकी संघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले होते. यावेळी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप तसेच पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश अंकुशराव यांनी या कार्यक्रमाचे औचीत्य साधून सर्व आदिवासी कोळी समाज यांना विनंती केली की आपापले अर्ज आदिवासी जात प्रमाणसाठी माळशिरस तहसीलदार येते द्यावे ही विनंती समाज बांधवांना केली. यावेळी प्रतापसिंह मोहिते पाटील कार्यकारी सोसायटी उदयनगर चेअरमन शिवाजीभाऊ इंगोले देशमुख, ग्रामपंचायत चौंडेश्वरवाडी माजी सरपंच सचिन जगन्नाथ देशमुख, माजी उपसरपंच दत्तात्रय देशमुख, ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत मोहिते, माजी सदस्य यशवंत लावंड , ग्रामसेवक अशोक सावंत, जिल्हा परिषदचे शिक्षक सुभाष कोळी, सुप्रिया उकिरडे मॅडम,अंगणवाडी सेविका सुमन फुले, शिरढोणे, ग्रामपंचायत कर्मचारी विकास सूर्यवंशी, आबा कांबळे, युवराज अंकुशराव सुमित अंकुशराव संतोष सुरवसे उपस्थित होते.
0 Comments