*मराठा आरक्षण ,
सोलापूर जिल्ह्यात वकिल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त....ll
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्हया सह संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा एस.टी. बसेस, खाजगी बसेस, यावर मोठा परिणाम झाला आहे .अनेक वाहने बंद असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयात पक्षकार वकील वर्ग यांना उपस्थित राहणे अशक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात वकिल व पक्षकार हे बाहेर गावातून येत असल्याने मोठी अडचण होणार आहे.यासाठी मंगळवार दिनांक 31 .10. 2023 रोजी आरक्षणाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचे वकीलानी ठरवले होते.
मात्र त्यामुळे कोणत्याही न्यायिक प्रकरणात पक्षकार आगर वकील गैरहजर असल्याचे कारणावरून संबंधिता च़्या हिता विरुद्ध कोणताही आदेश होऊ नये यासाठी योग्य ती काळजी वकिलानी घेऊन तसा ठराव समंत केला . सकाळी 11. वकील संघाचे सभागृहात सर्व वकिलांची मिटीग घेण्यात आली.त्यामध्ये वकिल संघाचे मा.अध्यक्ष अँड सुरेश बापु गायकवाड यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वास्तवता ,आंदोलकांची भुमिका, सनदशीर बाबी , सरकार ची भुमिका यावर सविस्तर भाष्य करीत एकदिवस कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहण्याचा प्रस्ताव मांडला.शिवाय आंदोलकाच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. सर्व सदस्यांनी हात उंचावून त्याला समर्थन दिले.
त्यानंतर अँड .बाबासाहेब जाधव, अँड.शरद पाटील अँड.पी.बी.लोढे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या कायदे विषयक बाबी स्पष्ट केल्या . ठरावाला पाठिंबा दिला.ं
या प्रसंगी अँड.उमेश मराठे, उपाध्यक्ष अँड.असिम बांगी, अँड.संजिव सदाफुले, अँड.गौतम खरात, अँड.सोपान शिदे, अँड.वामन कुलकर्णी, अँड.व्ही.सी.दरगड, अँड.के.चंद्र मोहन अँड.आय.बी.पाटील अँड.महेश जगताप, अँड.प्रज्योत मुटकूळे, अँड.संतोष पाटील, अँड.प्रमोद पाटील , अँड.व्ही.पी.शिंदे यांच्या सह वकिल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी सचिव अँड.करण भोसले यांनी आभार मानले.
0 Comments