चपळगावात ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

चपळगावात ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात

 चपळगावात ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चपळगाव व बावरकवाडी येथील महिलांसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शांभवी सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अवंती अभिजित पाटील व अभिजित पाटील मित्रपरिवारातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि स्व. संतोष दादा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी बोलताना शांभवी कल्याणशेट्टी म्हणाल्या की, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांना आत्मविश्वासही प्राप्त होतो. पाटील परिवाराने आयोजित केलेला हा सोहळा महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात प्रा. रोहित गुरव यांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध खेळांचे आयोजन केले. उखाण्यांची जुगलबंदी आणि कौशल्यावर आधारित खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेत सरस्वती तिवारी यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी साडी व रेफ्रिजरेटर जिंकला. द्वितीय क्रमांक साक्षी जाधव यांनी मिळवत एलईडी टीव्ही जिंकला, तर तृतीय क्रमांक शीतल जाधव यांनी मिळवत कुलर पटकावला. तसेच रेश्मा बाणेगाव व सावित्री सागरे यांनी अनुक्रमे गॅस शेगडी व मिक्सर जिंकत पारितोषिके मिळवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages